ई-बुक कसे वाचावे....


ह्या साईटवरून आपण जर ई-बुक प्रथमच डाउनलोड करता असाल तर कृपया हे Sample YouTube Video बघावेत ई-बुक कसे वाचावे : YouTube Video

ई-बुक हा एक फाईल टाईप आहे. आपल्याला ई-बुक वाचण्यासाठी एका ई-बुक रीडरची जरुर असते. ई-बुक, कॉम्प्युटर, मोबाईल, टॅब्लेट या कशावरही वाचू शकता. एकदा ई-बुक डाउनलोड केले की ते वाचताना आपल्याला इंटरनेटची आवश्यकता भासत नाही.

येथे उपलब्ध असलेली सर्व ई-बुक ही मराठी, संस्कृत याभाषेतील आहेत, तरी देखील आपल्या डिव्हाईसवर तो फॉन्ट असावा लागत नाही. बुकमार्क ठेवणे, शब्दाला किंवा ओळीला हायलाईट करणे, एखाद्या पानावर काही महत्त्वाचे संदर्भ किंवा काही टीपा लिहून ठेवणे, काही शब्द/वाक्य यांना सिलेक्ट करून त्यांचा ऑनलाईन शोध घेणे या सारख्या असंख्य गोष्टी तुम्ही ई-बुक रीडर मध्ये करू शकता. हे बुकमार्क आपल्या नेहमीच्या पुस्तकाप्रमाणे त्या त्या पुस्तकासाठीच असतात. तुम्ही अनेक पुस्तके वाचत असाल तरी जे पुस्तक तुम्ही जेथे बंद केले आहे तेथेच ते पुढच्या वेळेस चालू होते, तुम्हाला ते पान शोधत बसावे लागत नाही. तुम्ही पुस्तक लँडस्केप किंवा पोर्ट्रेट मोड मधे वाचू शकता. तुम्हाला हवा तो फाँन्ट साईज, फाँन्ट कलर ठेवू शकता. स्क्रीनचा ब्राईटनेस बदलू शकता. (यातीला काही वैशिष्ट्ये काही ई-बुक रीडरप्रमाणे बदलू शकतात)

ह्या ई-बुक मधे गीतेचा मूळ श्लोक, त्याखाली त्याचा पदच्छेद (जर आवश्यक असेल तर) केलेला श्लोक (वेगळ्या रंगात) आणि शेवटी त्याची ऑडियो फाईल दिलेली आहे. आपण श्लोक वाचताना त्या ऑडियो फाईलला क्लिक केले की फक्त तोच श्लोक आपणाला ऐकता येतो, एकदा तो पाठ झाल की आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ शकता. ह्या टेक्स्ट आणि ऑडियो ई-बुक साठी मात्र मून+ रीडर ( फक्त ॲन्ड्रॉईड युजर साठी ) हाच रीडर वापरावा. ह्या रीडरचे वैशिष्ट्य हे आहे की पुस्तक वाचन करताना कोणतीही ऑडियो फाईल क्लीक केली की ती स्क्रीनच्या बॉटम पाशी जाते आणि तुम्ही पुस्तक वाचू शकता तसेच पुढील किंवा मागील पानावर देखील जाऊ शकता, त्यावेळी ती ऑडियो फाईल तेथेच प्ले होत असते. ह्याचा जास्त उपयोग गीतेच्या सरावावेळी होतो. सरावसाठी वेगळे ई-बुक दिलेले आहे, ज्यामध्ये सर्व अध्याय एकत्र आहेत आणि प्रत्येक अध्यायाची एकच ऑडियो फाईल आहे.

  • प्रथम प्ले स्टोअर वरून मून+ रीडर ( फक्त ॲन्ड्रॉईड युजर साठी ) डाऊनलोड करावे.
  • मून+ रीडरला टॅप करून ते चालू करावे. आता डिव्हाइसवरील बॅक की वापरुन रीडर बंद करावा.
  • नंतर वेबसाईट वरून ई-बुक डाउनलोड करावे.
  • ह्या डाऊनलोड केलेल्या फाईलला टॅप करावे म्हणजे ती फाईल मून+ ई-बुक रीडर मधे उघडेल. (आपल्या डीफॉल्ट रीडरमधे). ई-बुकचे (Cover Page) उघडेल.
  • नंतर आपण येथे दिल्या प्रमाणे काही सेटींग्ज चेंज करून घ्यावीत (फक्त मून+ रीडर साठी)
  • आणि आता आपण ‘श्रीमत् भगवत् गीता’ शिकायला सुरवात करू शकता.

ई -बुक कसे वाचावे यासाठीच्या सर्व स्टेप्स साठी खालील लिंकवर क्लिक करावे. तेथे सर्व स्टेप्स इमेज स्वरुपात दाखविलेल्या आहेत. मून+ रीडरवर पुस्तक वाचताना कोणत्याही पानावरुन परत मूळ स्क्रीन वर जाण्यासाठी आपण आपल्या डिव्हाइसचे बॅक बटण वापरू शकता. हे सर्व करताना प्रत्येक गोष्ट खूप सोपी करायचा प्रयत्न केला आहे. तरीदेखील काही उणीवा राहिल्या असतील, काही चुका झाल्या असतील किंवा आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर त्या आम्हाल नक्की कळवा. संपर्क मेनू मधे आमचा ई-मेल आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत.