भगवत् गीतेतील अष्टांग योग : निरुपणकार : कीर्तनकार श्री. वामनबुवा वासुदेव कोल्हटकर


भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी योगाचा (अष्टांग योग) उल्लेख आला आहे. तसे बघितले तर गीता हा श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला तयार करण्यासाठी केलेला उपदेश आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये देखील अनेक ठिकाणी योगाचे महत्त्व विशद केलेले आहे. या प्रवचन मालिकेमध्ये श्री. वामन वा. कोल्हटकर यांनी त्यावर अतिशय उत्तम विवेचन केले आहे. योगाच्या अनुषंगाने अनेक वैदिक दाखले, उदाहरणे देखील दिलेली आहेत. या प्रवाचनांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक गोष्टीचे दाखले दिलेले आहेत, ‘ही गोष्ट आपल्या पुराणात, वेदांत आहे’ असे नुसतेच न सांगता त्या पुराणाचे, वेदांचे, ऋषींचे संदर्भ सांगितले आहेत. आपल्या ऋषींनी अनेक गोष्टींचा खूप सखोल अभ्यास केला होता. अनेक विषयांत संशोधन केले होते. त्याची काही उदाहरणे देखील येथे आहेत. 
अष्टांग योग म्हणजे फक्त आसने , प्राणायाम, ध्यान इतकाच मर्यादित नसून त्याचे खरे स्वरूप खूप वेगळे आहे. योगमार्ग आचरुन देखील आपण मुक्ती प्राप्त करू शकतो.  योग आपल्याला खऱ्या ब्रह्मस्वरूपाची ओळख करून देतो. योगमार्ग आचरुन जीवाचे शिवाशी मिलन साधता येते.  भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा योगमायेचा आश्रय करून अर्जुनाला गीता सांगितली होती.  या प्रवचन मालिकेत गुरुजींनी  (श्री. कोल्हटकर) यांनी याच विषयावर अतिशय सुंदर विवेचन केले आहे

भगवत् गीतेतील अष्टांग योग" ह्या एकूण १८ भागांच्या योगाख्यानाची यथासांग सांगता झाली . भगवत् गीतेमध्ये १८ ला विशेषमहत्त्व आहे. भगवत् गीतेचे अध्याय १८ आहेत, धर्मयुद्ध १८ दिवस चालले होते, दोन्हीकडील सैन्यांची एकूणसंख्या १८ अक्षोहिणी होती. या प्रवचनमालिकेचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले ती तिथी होती एकादशी आणि एकूण भागांची संख्या होती१८. भगवान श्रीकृष्ण आणि भगवत् गीतेच्या बाबतीत एकादशी आणि १८ या दोन्ही गोष्टींनाविशेष महत्त्व आहे. काहीही ना ठरवता हे दोन्ही योग येथे आपोआप जुळून आले.त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की या उपक्रमाला त्या परब्रह्माचे आशीर्वाद होते यात शंका नाही. आपले प्रश्न, अभिप्राय, शंका आपण You Tube Comment Section or Website Form वरून विचारू शकता. लवकरच एका नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत. भवगवंताचे आशीर्वाद आणि आपल्या सदिच्छा आमच्यापाठीशी सतत राहोत हीच प्रार्थना. सर्व प्रवचने आमच्या YouTube Channel वर देखील ऐकता येतील. Click For You Tube Playlist



श्रीमद्भगवद्गीता अर्थ : निरूपणकर्त्या सौ. रमा जोशी ऐकण्यासाठी येथे Click करावे.

भगवत् गीतेतील अष्टांग योग
  • भाग १ : परिचय आणि प्रस्तावना
  • भाग २
  • भाग ३
  • भाग ४
  • भाग ५
  • भाग ६
  • भाग ७
  • भाग ८
  • भाग ९
  • भाग १०
  • भाग ११
  • भाग १२
  • भाग १३
  • भाग १४
  • भाग १५
  • भाग १६
  • भाग १७
  • भाग १८